अतिग्रे येथे मराठा आरक्षण साठी साखळी उपोषण

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी भरत शिंदे :                 
  
अतिग्रे तालुका हातकलंगले येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज अतिग्रे यांच्या वतीने साखळी उपोषण आंतरवाली सराटी येथे मराठी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास अतिग्रे येतील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी दिनांक 1/1 1/2023 रोजी सकाळी नऊ वाजलेपासून साखळी उपोषणास सुरुवात केली . 

तसेच दिनांक 1/1 1/2023 रोजी संपूर्ण गाव बंद करून गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद करण्यात आले यावेळी अतिग्रे गावातील ग्रामपंचायत अतिग्रे ,बौद्ध समाज, चर्मकार समाज ,मातंग समाज ,नाभिक समाज ,यांनीही पाठिंबा दर्शवून पत्र देऊन या उपोषणास पाठिंबा दर्शविला असून प्रत्येक समाजाच्या वतीने गावातील नागरिक या उपोषणास उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post