पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण.

 

                             

                 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

      भारतरत्न व भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व देशाचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी महापौर कमल व्यवहारे व माजी नगरसेवक मुख्तार शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

     यावेळी बोलताना कमल व्यवहारे म्हणाले की, ‘‘सरदार वल्लभभाई पटेल हे कणखर, कडक, शिस्तप्रिय व स्पष्ट वक्ता होते. जगभरात त्यांची महती लोहपुरूष म्हणून झाली होती. तसेच ते प्रखर देशभक्त होते. त्यांचा धर्मांध, जातीयवादी शक्तींना प्रखर विरोध होता. स्व. इंदिराजी गांधी या देशावर निस्सिम प्रेम करणाऱ्या, जाती धर्माच्या पलिकडे विचार करणाऱ्या, देशामध्ये सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या आयर्न लेडी होत्या. या दोन्ही देशभक्त नेत्यांना मी आज भावपूर्ण आदरांजली अर्पण करते.’’

     यावेळी माजी महापौर कमल व्‍यवहारे, मुख्तार शेख, आण्णा राऊत, बळीराम डोळे, राजेंद्र पेशने, संतोष काते, दिलीप लोळगे, ॲड. राजश्री अडसूळ, शारदा वीर, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, संगीता क्षिरसागर, चैतन्य पुरंदरे, ज्ञानेश्वर निम्हण, डॅनियल मगर, चंद्रकांत नार्वेकर, युवराज मदगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post