माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पुणे ग्रा. पोलीसांना दिली शाबासकी

अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांची पाठ थप थपाऊन  त्यांना शाबासकी दिली व  पुणे ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले



 प्रेस मीडिया लाईव्ह

 जीलानी उर्फ मुन्ना शेख

पुणे :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी दि. २९ नोव्हें. २०२३ रोजी कैवल्यधाम योग संस्था, लोणावळा येथे भेट दिली. यावेळी पुणे ग्रा. पोलीसांनी  अत्यंत चोख नियोजन केले होते, नियोजन पाहून खुश  होऊन माजी केंद्रीय मंत्री मा. सुरेश प्रभू यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री मितेश घट्टे यांची पाठ थप थपाऊन त्यांना शाबासकी दिली  व पुणे ग्रामीण पोलिसांचे कौतुक करून  शाबासकी  दिली . 

 


लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देवून आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न केले. या दौ-याच्या निमित्त प्रशासन सज्ज आणि पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. या आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र नियोजित कार्यक्रमासाठी जाणार त्यामुळे, सुरक्षेच्या उपायोजना  पोलिस प्रशासनाकडून आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम या मार्गावरील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील वाहतुकीमध्ये  बदल करण्यात आले होते

सदर बाबत पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३६ अन्वये आदेश पारीत करण्यात आले होते. तसेच नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते

Post a Comment

Previous Post Next Post