विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहून विविध स्पर्धा परीक्षेमध्ये केंद्र अग्रेसर राहण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत--शिक्षण विस्तार अधिकारी जहांगीर मुल्लानी

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले : 

शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान व उपक्रम वापरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहून विविध स्पर्धा परीक्षेमध्ये केंद्र अग्रेसर राहण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत ,असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी जहांगीर मुल्लानी यांनी केले.शिरोली येथे शाळा नंबर तीन मध्ये आयोजीत शिक्षण परिषदेमध्ये ते बोलत होते.अध्यक्षस्थानी केंद्र  मुख्याध्यापक भिमा कांबळे होते.

    या शिक्षण परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शक दत्तात्रय  गायकवाड यांनी पिजिआय व एफएलएन या विषयी व संजय जाधव यांनी व्हिडिओ निर्मीती या  विषयावर मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख कृष्णात पाटील यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले.

   यावेळी मुख्याध्यापक राजेश जाधव,पावलस चौगुले,दीपा देवूडकर,अंजना संकपाळ,मेहताब मणेर ,गिरीश शेळके,गौरी नणदीकर,जनार्दन कुंभार, वैशाली सलगर ,मानिनी कुंभार,अर्चना म्हेतर ,नईम अत्तार,किरण पाटील,रघुनाथ कुंभार यांचेसह शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन गोरखनाथ पाटील यांनी केले.

फोटो ओळ  शिरोली येथे  शिक्षण परिषदेमध्ये  नुतन शिक्षण विस्तार अधिकारी जहांगीर मुल्लानी यांचा सत्कार करताना राजेश जाधव,केंद्रप्रमुख  कृष्णात पाटील यांनी,पावलस चौगुले,गोरखनाथ पाटील,नईम अत्तार व अन्य

Post a Comment

Previous Post Next Post