कवी विठ्ठल जावळे आंतरभारतीचा विचार सतत जागा ठेवतील

ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी :  गेली ४० वर्ष  समर्पित व कर्तव्यनिष्ठ भावनेतून आपली सेवा बजावणारे कवी विठ्ठल जावळे हे ध्येयवेढे अष्टपैलू आंतरभारतीचे सेवक आहेत. राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी यांचा विचार त्यांच्या अंगी भिनलेला  आहे. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्त होण्याचा अधिकारच नाही.वयाचे बंधने त्यांच्या नितळ व पारदर्शक सेवा कार्याच्या आड येऊ शकत नाही.  विठ्ठल जावळे यांची झोकून  काम करण्याची पध्दत सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरक अशीच ठरेल. विठ्ठलाला युगानु युगे  लोककल्याणासाठी उभे  राहावेच लागेल.तसेच कविलाही निवृत्त होता येत नाही. विठ्ठल जावळे हे नियत नियमानुसार आंतरभारतीच्या सेवेतून निवृत्त झाले असले तरी ते सतत आंतरभारतीचा विचार जागवण्यासाठी कार्यरत राहतील या शंका नाही असे गौरव उद्गगार समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस ज्येष्ठ विचारवंत 

,गझलकार श्री प्रसाद कुलकर्णी यांनी काढले. ते आंतरभारती विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी नाईक कवी  विठ्ठल जावळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री शामराव नकातेसाहेब होते.

 अध्यक्षीय भाषणात शामराव नकाते यांनी विठ्ठल जावळे यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा करीत संस्था व शाळेप्रती त्यांची असणारी आत्मीयता याचा विशेष उल्लेख केला. आंतरभारती शाळेत त्यांना दररोज पुन्हा यावेच लागेल .त्यांची शाळेला -संस्थेला आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट अधोरेखित केले .यावेळी विठ्ठल जावळे यांनी पूज्य  साने गुरुजी व आंतरभारती विद्यालय इचलकरंजी असा नामफलक शाळेस  भेट दिला. त्याचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.  

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आंतरभारती विद्यालयाचे मुख्याध्यापक  एम.डी. पाटील यांनी विठ्ठल जावळे हे त्यागाचे व निष्ठेचे प्रतिक असल्याचे स्पष्ट करीत गेली४० वर्षे संस्थां व शाळेसाठी चंदनासारखे झिजल्याचे  सांगितले .वेळ काळ याचा विचार न करता शाळेसाठी संस्थेसाठी २४ तास हजर असणारे विठ्ठल जावळे हे कदाचित संस्थेसाठी निष्ठेने काम करणाऱ्या सेवकांच्या पिढीतील शेवटचे शिलेदार असावेत असेही गौरव उद्गार काढले .वरिष्ठ लिपिक  विजय कवडे  यांनी विठ्ठल जावळे यांच्या बेधडकपणे व सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्याच्या पद्धतीचा उल्लेख करीत "जिथे कमी तिथे जावळे "असे शाळेतील समीकरण असल्याचे स्पष्ट केले .माजी मुख्याध्यापक व्ही.एस. ढवळे यांनी  विठ्ठल जावळे यांनी नोकरीच्या पहिल्या दिवशी संस्थेची शाळेची विचाराची जी  बांधिलकी स्वीकारली ती शेवटच्या दिवसापर्यंत तशीच ठेवली. गंजून जाण्यापेक्षा झिजलेले बरे या न्यायाने त्यांनी चाळीस वर्षे से अंग न चोरता ,कामातून पळ न काढता, कोणत्याही पद्धतीची  कारणे न सांगता स्वतःला झोकुन देऊन त्यांनी आपली सेवा बजावली असल्याचे स्पष्ट केले.                                    एक कवी, एक वक्ता, एक उत्तम सुतार, एक उत्तम गवंडी, एक उत्तम मार्गदर्शक, एक कुटुंब वात्सल्य पिता -पती ,असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जावळे यांचे आहे. कराटे क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे अतुलनीय असेच आहे .  यावेळी सहाय्यक शिक्षक  कपिल कोळी, सौ चंदुरे  मॅडम यांनी  विठ्ठल जावळे म्हणजे शाळेची ढाल असल्याचे स्पष्ट करीत  सर्वांच्या सुख दुःखामध्ये अग्रस्थानी असणारे संवेदनशील मोठ्या मनाचा माणूस  जावळे असल्याचे नमूदकेले.  शाल ,श्रीफळ ,पेहराव व मानपत्र देऊन  विठ्ठल जावळे यांचा सपत्निक  सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला .मानपत्राचे वाचन एम. एम.पाटील यांनी केले. पाणवलेल्या डोळ्यांनी सत्काराला उत्तर देताना विठ्ठल जावळे यांनी आनंदी मी ,तृप्त मी, समाधानी मी, अशी भावना व्यक्त केली  शाळा हेच माझे घर आहे. आंतर भारती हा माझा श्वास आहे. मी जो कोणी आहे तो फक्त माझ्या आंतरभारती विद्यालयामुळेच आहे .माझ्या या वाटचालीमध्ये संस्थेचे अध्यक्ष सर्व संचालक ,सर्व आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक , विदयार्थी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य माझी सुविध  पत्नी मुले सुना  नातवंडे भाऊ-बहीण समाजातील सर्व समाज बांधव यांचे मोलाचे सहकार्य मिळाले मला त्यांचे आभार मानणे इष्ट होणार नाही त्यांच्या ऋणात राहणे मलाआवडेल माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर आपण मोठ्या मनाने माफ करावे अशी विनंती केली .यावेळी उपस्थित सभागृहातील सर्वांच्या डोळ्यात पाणी आले .सर्वांची मने गहिवरून गेली. 

 यावेळी आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपध्यक्ष विश्वनाथ जगदाळे, सचिव गणपतराव फाटक, संचालक श्री अभिजीत होगाडे,श्री रंगरेज ,डॉ.आरती कोळी,  माजी मुख्याध्यापिका श्रीमती एस .टी .भागवत , माजी मुख्याध्यापक सुभाष मोटे , के. एस.कारंडे  , चंद्रकांत पाटील,  तोरसकर ,  रणजीत देशमुख, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे संचालक  श्रीकांत कदम , महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती हातकणंगले तालुका अध्यक्ष  वि.ह. सपाटे,चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक आर. के निमणकर, तात्यासाहेब मुसळे हायस्कूलचे मुख्याध्यापक रवींद्र गांजवे आदीसह विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, आंतरभारती विद्यालय इचलकरंजी, माध्यमिक विद्यालय सावर्डे, पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर इचलकरंजी चे सर्व आजी माजी शिक्षक शिक्षकेत्तर  कर्मचारी माजी विद्यार्थी पालक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते ,विठ्ठल जावळे यांचे परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.पी.सातपुते यांनी केले तर शेवटी आभार आंतरभारती विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.वर्षा फाटक यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post