आम आदमी पार्टीच्या पुणे शहर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : आम आदमी पार्टीच्या पुणे शहरातील नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीतील विविध पदाधिकाऱ्यांना पक्षाचे राज्य संघटन मंत्री अजित फाटके पाटील शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे पक्षाचे नेते मुकुंद किर्दत तसेच महिला शहराध्यक्ष सुरेखा भोसले यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. 

या समारंभात अनेक नवीन कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. शहरातील सर्व भागातील तसेच विविध समाज घटकांना कार्यकारणीत स्थान दिल्याने कार्यक्रमाला पक्षाचे कार्यकर्ते तसेच पुणे शहरातील अनेक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्याच्या संख्येवरून आम आदमी पार्टीचा प्रभाव पुणे शहरात वाढत असल्याचे निदर्शनास आले. नियुक्ती झालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षाचे राज्य संघटन मंत्री अजित फटके पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नवीन जबाबदारी पार पाडताना पक्षाच्या वतीने जाहीर झालेले जनशक्ती अभियान प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने जोमाने राबविण्याचे आवाहन केले

तसेच शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी पक्षकार्यावरच लक्ष केंद्रित करण्याची सूचना यावेळी केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली*.

   

Post a Comment

Previous Post Next Post