आम आदमी पक्षातर्फे विसर्जित गणेश मूर्तींच्या संकलनाची मागणी



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : बी टी कवडे रोड येथील कॅनॉलच्या पाण्यात विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींची दुरावस्था झाली असून या मूर्ती कॅनॉलच्या किनाऱ्यालगत भग्नावस्थेत पडल्या आहेत. आनंद आणि उत्सवात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर अशा प्रकारे गणेश मूर्तींची विटंबना होत असल्याने बी टी कवडे रोड येथील आम आदमी पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते फेबियन अण्णा सॅमसन प्रभाग २१ मुंढवा कोरेगाव पार्क यांनी खेद व्यक्त करून महापालिकेतील अधिकाऱ्यांना या भग्नमूर्तींचे तात्काळ संकलन करण्याची मागणी केली आहे


गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक मोठा उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे तथापि नागरिकांनी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या हौदा मध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करून त्या संकलन केंद्रात जमा करायला हव्यात असे आवाहन आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सर्व नागरिकांना केले.

याप्रसंगी वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी निसार मुजावर यांच्यासह  मुकादम सुहास पवार, संदीप पवार,आम आदमी पक्षाचे अजय महानवर गुणाजी मोरे, किरण कांबळे, आकाश कांबळे, सोहित कांबळे, प्रमोद रानीसे, वेंकी गोलांडे, गौरव देशमुख, आकाश पाटील आणि तेजस उपस्थित होते. तर विंग्स फॉर ड्रीम एनजीओ चे हर्ष झाडे, सुमित बिरादर, महेश गाडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post