भरधाव वेगात कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कराड - काल दुपारी भरधाव वेगात कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जण जागीच ठार झाले.या अपघातात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरतअसलेले पो.कॉ.नितीन बापूसाहेब पोवार (वय 34 रा.हणबरवाडी ,से.कापशी)यांच्या सह बहीण मनिषा आप्पासाहेब जाधव (42)आणि भाचा अभिषेक (26 रा.जरळी,गडहिग्लज) अशी अपघातात मृत्यू झालेलयाची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की,नितीन पोवार हे आपल्या कारने बहीण भाच्या समवेत पुण्याला चालले होते.तेथील महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला कारने  पाठीमागून जोरदार धडक  दिली असता या झालेल्या भीषण अपघातात कार मधील तिघे जण जागीच ठार झाले.अपघात स्थळी असलेल्या नागरिकांनी महामार्ग पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन कार मधील मृतांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले .या अपघाताची माहिती मिळताच त्या महामार्गावर नवीन पोलिस चौकीचा उदघाटनाचा कार्यक्रम चालू होता.या अपघाताची मिळताच उपस्थित असलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी कार्यक्रम अर्धवट सोडून घटना स्थळी दाखल झाले.या अपघाताची नोंद तेथील पोलिस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post