नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा ; जामिन तीन महिन्यांनी वाढवला



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुंबई : मनी लाँडरिंग अर्थात पैशाच्या अफरातफर प्रकरणात नवाब मलिक तब्बल दीड वर्ष जेलमध्ये होते. मात्र वैद्यकीय उपचारासाठी त्यांना 11 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर झाला होता. या जामीनाला आता सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. तब्बल तीन महिन्यांची मुदतवाढी नवाब मलिकांच्या जामीनाला देण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवा मलिकांनी प्रकृती अस्वास्थतेचं कारण देत अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. गेल्या वर्षभरापासून मलिक कोर्टाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात घेत होते. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. अखेर 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. जामीनाची मुदत संपत असल्यामुळे मलिकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्याप्रकरणी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देत नवाब मलिकांच्या जामीनाला मुदतवाढ दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post