इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्याने राबविण्यात येणार : आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे



प्रेस मीडिया लाईव्ह :

   इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर,फूटपाथ वर तसेच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आल्याने महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासकओमप्रकाश दिवटे यांनी सदरची सर्व अतिक्रमणे तातडीने काढणेचे आदेश महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागास दिले आहेत.

   या आदेशानुसार सहा आयुक्त केतन गुजर यांच्या मार्गदर्शना नुसार  महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने  दि.११ आणि १२ ऑक्टोंबर पासुन अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शहरातील  गोविंदराव हायस्कूल, सिटी सर्व्हे ऑफिस, नाट्यगृह परिसर, स्टेशन रोड, ए.एस.सी. महाविद्यालय परिसर, यशवंत प्रोसेस, उत्तम प्रकाश टॉकीज चौक यासह मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. यामध्ये विविध  दुकानदारांनी रस्त्यावर स्टॅण्ड,  रस्त्यावरील फळ विक्रेते, यांच्या  अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला. 

     यापुढेही संपूर्ण शहरात सातत्याने महानगरपालिकेची अतिक्रमण मोहीम तीव्रपणे राबविणेत येणार  असल्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक  ओमप्रकाश दिवटे यांचेकडून देणेत येत आहे.

         या मोहिमेत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांचेसह धोंडिराम जावळे, कैलास आवळे, विकास लाखे, मारुती जावळे,पिंटू कांबळे, प्रकाश हेगडे आदि कर्मचारी सहभागी होते.


         

Post a Comment

Previous Post Next Post