मराठा आरक्षण आंदोलकानी आमदार सोळंके यांचे राहते घर पेटवून दिले



प्रेस मीडिया लाईव्ह :

मराठा आरक्षण मुद्द्यावर आंदोलक  प्रचंड आक्रमक झाले असून आंदोलकांनी आमदार सोळंके यांचे राहते घर पेटवून दिले आहे. ज्यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून अनेक वस्तू भस्मसात झाल्या आहेत. आंदोलकांनी सुरुवातीला आमदारांच्या घराच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बंगल्याच्या दारात पोर्चमध्ये उभी असलेली फॉर्च्युनर कार पेटवून दिली. धक्कादायक म्हणजे या वेळी आमदार सोळंके हे घरातच होते. कारला लागलेली आग पुढे घराराही लागली. दरम्यान, आंदोलक पांगले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आंदोलकांनी फॉर्च्युनर कारला आग लावल्याचे वृत्त एबीपी माझाने लाईव्ह प्रक्षेपणात दाखवले. या वेळी या वाहिनीसोबत आमदार सोळंके यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या मी माझ्या घरातच आहे. काही आंदोलक मला भेटायला आले. त्यांनी आपण समाजाच्या बाजूने उभे राहा असे मला सांगितले. नंतर त्यांनी माझ्या वाहनाला आग लावली. मी मराठा समाजाचाच आमदार आहे. माझा कोणावरही राग नाही. आंदोलकांवरही राग नाही. त्यांना कोणीतरी विरोधक चिथावणी देत आहेत. मला त्या खोलात जायचे नाही. पण आपला कोणावरही राग नसल्याचे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगि | Beed, Maharashtra: Maratha reservation agitators vandalised and set the residence of NCP MLA Prakash Solanke on fire.

पाठिमागच्या दोन दिवसांपासून आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे मराठा समाज आणि आंदोलक संतप्त होत आहेत. परिणामी आक्रमक आंदोलकांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली आहे. काही आंदोलकांनी तहसील कार्यालयातील वाहने पेटवली तर काहींनी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस देखील आंदोलकांकडून पेटवल्या.

Post a Comment

Previous Post Next Post