मशाल पेटवून सकल मराठा समाजाचे मनोज जरांगेना पाठिबा .



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-दसरा चौक येथे सकल मराठा समाजाने मशाल पेटवून मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे या मागणी साठी दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या नेत्यांनी मशाल पेटवून आंदोलनाला सुरुवात करून साखळी उपोषणास प्रारंभ केला.


या आंदोलनाला महिलानी मोठ्या उत्साहात सामील झाल्या होत्या. या समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आमच्या पध्दतीने गेल्यास ते सरकारला परवडणारे नाही.असे विवीध नेत्यानी आपले मत व्यक्त केले.या आंदोलनाला अनेक संघटनानी पाठिंबा दिला.या आंदोलनात  विजय देवणे ,आर.के.पोवार,दिलीप देसाई,ईश्वर परमार ,यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी .महिला कार्यकर्त्या आणि मराठी समाजातील सर्व संघटना तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post