स्वच्छता पंधरवडा अंतर्गत व महात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने सर्व विभागांची स्वच्छता



प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी :   संभाजी चौगुले

कोल्हापूर ता.02 : दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा - स्वच्छता ही सेवा 2023 हा उपक्रम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन महापालिकेच्यावतीने सर्व कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. सकाळी 9.00 वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छतेची व पर्यावरणाची शपथ घेण्यात आली. 

यामध्ये मी स्वत: स्वच्छतेच्या प्रति जागरुक राहील आणि त्यासाठी वेळही देईल, दरवर्षी 100 तास म्हणजे प्रत्येक आठवडयातून दोन तास श्रमदान करुन स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन. मी स्वत: घाण करणार नाही, आणि दुसऱ्याला करु देणार नाही. सर्वप्रथम मी स्वत:पासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली/वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरवात करेन अशी शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर स्वच्छता दूत अमित देशपांडे यांनी पर्यावरणाची शपथही दिली. यामध्ये मी आपला संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवीन, तसेच पर्यावरण, संवर्धन, सप्तपदीचे पालन करेन, मी दरवर्षी एकतरी झाड लावून त्याचे संवर्धन करेन, मी कचरा उघडयावर टाकणार नाही, तो कचरा वर्गीकरण करुन घंटागाडीत देईन, मी प्लॅस्टिक पिवशीचा वापर करणार नाही. मी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरेन अशी शपथ घेण्यात आली. यानंतर महापालिकेच्या विविध विभागांची आज त्या त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता करण्यात आली.


            यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लवाड, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, विजय वणुकुद्रे, स्वच्छता दूत अमित देशपांडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post