श्री सदस्यांनी राबवली स्वच्छता मोहीम




प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

पनवेल : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार रविवार  01 ऑक्टोबर 2023 रोजी  सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत पनवेल शहर,नवीन पनवेल, खांदा कॉलनी व ग्रामीण भागात स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. या अभियानात साधारण 1 हजार 300 पेक्षा जास्त श्री सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी सर्वांनी मिळून साधारण 7 टन ओला व सुका कचरा जमा करून स्वच्छ्ता केली.

  

    पनवेल शहर, पनवेल तालुका मध्ये ठिकाणी श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमेत अनेक श्री सदस्य सहभागी झाले होते. यापूर्वी देखील श्री सदस्यांनी अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड यासारखे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post