प्रयाग चिखलीचा ग्रामसेवक लाच स्वीकारताना ताब्यात.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर -रहात्या घराचा गावठाण उतारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना प्रयाग चिखली येथील ग्रामसेवक गोरख दिनकर गिरीगोसावी (वय 50 रा.कणेरीवाडी ,करवीर).याला  लाचलुचपतच्या पथकाने पकडले.तक्रारदार याला कर्ज प्रकरणात रहात्या घराचा गावठाण उतारा पाहिजे होता.त्यासाठी रितसर अर्ज केला होता.

तो उतारा देण्यासाठी ग्रामसेवक गिरीगोसावी याने दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.याची या पथकाने खातरजमा करून त्या ठिकाणी सापळा रचून गिरीगोसावी याला लाच घेताना रंगेहाथ पकडून त्याच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोलिस निरीक्षक श्री.बापू सांळुखे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post