शिक्षणाधिकारी यांच्या मनमानी कारभारला कंटाळून अर्ध नग्न होऊन आंदोलनाचा इशारा

 शिक्षण अधिकारी जनतेसाठी  की शिक्षणाच्या नावाखाली लूट करणाऱ्यांसाठी ?

 प्रेस मीडिया लाईव्ह

अनवर अली शेख : 

शिरूर शहरातील शिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी  यांच्या कारभाराला सर्वच कंटाळले आहेत शेवटी भारतीय बहुजन पालक संघ आणि बहुजन मुक्ती पार्टी यांचा अर्ध नग्न होऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहेत .नामांकित खाजगी शाळांकडून बेकायदेशीर फी आकारली जाते, फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, विद्यार्थ्यांचे निकालपत्र अडवून ठेवली जातात,शिक्षणापासून दूर करण्याचा किंवा निकाल रोकण्याचा शाळा वेवस्थपनाला अधिकार आहे का ?

शिक्षण अधिकारी जनतेसाठी का शिक्षणाच्या नावाखाली लूट करणाऱ्यांसाठी ? असा प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.तसेच विविध शासन आदेशांची पायमल्ली करून त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे अनेक तक्रारी संघटनेने पुराव्यासह उघड केल्या आहेत परंतु शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कारवाई करण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करतायत, असा गंभीर आरोप  भारत मुक्ती पार्टी आणि पालक संघ यांच्या तर्फे केला जात आहे .उलट पाठपुरावा करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जातो असा ही आरोप आहे,

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी सामान्य जनतेकडून होत आहे . दोषी शाळा आणि संस्था चालकांना वाचवण्यासाठी प्रकरणे प्रलंबित ठेवून चौकशी अहवाल दडवून ठेवण्याचा भयंकर महा पाप  केला जात आहे, जाणीपूर्वक पद्धतीने गैर कृत्य करणाऱ्याला खत पाणी घालण्याचा डाव शिक्षणाधिकरी करत आहे, वारंवार मागणी करूनही चौकशी अहवाल जाहीर करत नाही त्यामुळे व्यथित होऊन भारतीय बहुजन पालक संघ आणि बहुजन मुक्ती पार्टी ने अर्धनग्न ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. चंद्रावर पोहचलो तरी शिक्षणा साठी आज  ही लढावं लागतं आहे हे ही सत्य नाकारता येणार नाही कधी प्रशासनाला जाग येणार आणि सामान्य माणसाची पिळवणूक कधी थांबणार अश्या अनेक चर्चांना शिरूर तालुक्यात उधाण आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post