संतुलित आहार विहार आणि सुसंस्काराने आजचे विद्यार्थी सुदृढ होऊन देशाचे आधारस्तंभ बनतील : डॉ. कुमार पाटील



प्रेस मीडिया लाईव्ह : 

टाकवडे प्रतिनिधी :

आजचे हे विद्यार्थी उद्याच्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत; त्यामुळे त्यांनी संतुलित आहार घेऊन योग्य व्यायाम व सुसंस्काराद्वारे सुदृढ सुसंस्कृत बनतील व देशाचे उज्वल भवितव्य घडवतील असे विचार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरढोणचे सचिव, साहित्यिक डॉ कुमार रामगोंडा पाटील यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे येथे गुरुकुल प्रकल्प बाह्य तज्ञ मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना *"आहार विहार आरोग्य व संस्कार"* या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते. 

स्वागत, प्रास्ताविक व  व्याख्यात्यांची ओळख गुरुकुल प्रकल्पविभाग प्रमुख श्री सी पी शेटे सर यांनी करुन दिले. आपल्या मार्गदर्शनात डॉ कुमार पाटील आपल्या सुदृढ शरीरासाठी अत्यावश्यक संतुलित आहार, आहारातील घटक पिष्टमय पदार्थ प्रथिने स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे क्षार व पाणी यांचा  वापर, या घटकांचे महत्त्व , आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम, बाहेरील खाद्यपदार्थांचे वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम,सुविचार, सदाचार, सुसंगती, सद्गुरूंचा आशीर्वाद या सुसंस्कारासाठी आवश्यक गोष्टी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ कुमार पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सेवा जेष्ठ शिक्षक श्री सी एन कागवाडे यांनी केले. यावेळी गेस्ट लेक्चर विभाग प्रमुख श्री पी जी जाधव सर, पर्यवेक्षक श्री इनामदार सर, श्री सासणे सर, गुरुकुल विभाग, विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री एस के सावेकर सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post