माजी सैनिक नरेंद्र पाटील वनपाल सेवेतून सेवानिवृत्त; 18 वर्षे देशसेवा आणि 18 वर्षे वन विभागाची सेवा



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

पेन तालुक्यातील उचेडे गावचे  सुपुत्र माजी सैनिक श्री नरेंद्र देवजी पाटील हे वन विभागाची १८ वर्षे सेवा करून वनपाल सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. नरेंद्र पाटील यांचा गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाला. सन १९८४ साली सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथे इयत्ता १० वी शिक्षण घेतल्यानंतर २२ ऑक्टोबर १९८५ ला भारतीय सैन्य दलात भरती झाले. सुरुवातील सेना पोलीस मुख्यालय बंगलोर येथे शिपाई पदावर काम केले. त्यानंतर पहिली पोस्टिंग फस्ट आर्मड पटियाला पंजाब येथे त्यानंतर ३ कोर नागालँड, पठाण कोट, पुणे महाराष्ट्र जम्मू काश्मिर, यु पी एरिया, अरुणाचल प्रदेश तसेच चीनच्या सीमेवर देखील कामगिरी बजावली आणि ३१ मे २००३ रोजी सैन्य दलातून १८ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्ती झाले. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी औद्योगिक

कंपनी इस्पात, एम आय डीसी १ वर्ष सिक्युरिटी आणि काही काळ रिक्षा देखील चालवली. त्यांना २ मुली आणि एक मुलगा असून त्यांच्या शिक्षणाचा विचार करीत नोकरी करायचे ठरवले. सन ऑगस्ट २००५ ला नरेंद्र पाटील महाराष्ट्र शासन वन विभागात ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य येथे वनरक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर वनपरिक्षेत्र वडखळ येथे वनरक्षक म्हणून ५ वर्षे नंतर प्रमोशन होऊन

वनपरिक्षेत्र पेण कार्यालय येथे वनपाल म्हणून ८ वर्षे काम केले आणि आता वनपरिक्षेत्र नागोठणे येथून महाराष्ट्र वन विभागात १८ वर्ष सेवा करून वयाच्या ५८ व्या वर्षी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. यावेळी माजी सैनिक नरेंद्र पाटील यानी बोलताना सांगितले की, ३६ वर्षे सेवा करताना आम्हला वेगवेगळे अनुभव मिळाले. यामध्ये भारत मातेची सेवा केली याचा आम्हाला अभिमान वाटतो. गरिबीची जाणीव

असल्याने आम्ही जरी शासकीय सेवेतून निवृत्त होत असलो तरी सामाजिक कार्यातून मी माझी सेवा सुरू ठेवणार आहे. सेवा निवृत्ती कार्यक्रमाला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या मान्यवरांचे नरेंद्र पाटील यानी आभार मानले. हा सेवानिवृत्ती कार्यक्रम रामवाडी येथे संपन्न झाला. यावेळी माजी सैनिक सामाजिक संघटना पेण पदाधिकारी व सदस्य, माजी सैनिक सामाजिक संघटना खोपोली पदाधिकारी तसेच जय हनुमान कबड्डी संघ उचेडे, आनंदनगर रामवाडी, ग्रामस्थ मंडळ उचेडे व मित्र परिवार यांनी भेटन शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post