सेलू येथे श्री महेश्वर शिवलिंगाची स्थापना.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

डॉ. शिवाजी शिंदे : परभणी.

सेलू:  शहरातील महेश नगर येथील श्री साई मंदिर येथे  श्रावणमास निमित्त माजी नगराध्यक्ष विनोद बोराड़े व मित्र मंडळ यांनी तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरम येथून आणलेल्या श्री महेश्वर शिवलिंगाची स्थापना केली. या महोत्सवात दि. 5 व 6 सप्टेंबरला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

7 सप्टेंबरला वेदांताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज,सद्गुरू सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा,सद्गुरू काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी आदी पुरोहिताच्या शुभहस्ते सद्गुरू माहेश्वर शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. प्राण प्रतिष्ठा पूजेत अग्निस्थापना,नवग्रह स्थापना हवन,मृत्यू देवता हवन,धान्या दिवास,शय्यादिवास ,निद्रा आवाहन व आरती आदी  तीन दिवस विविध  विधी कार्यक्रम घेण्यात आले. यात शिवलिंग स्थापना,होम हवन,श्रीहरी कीर्तन,आणी शहरातील येणाऱ्या प्रत्येक महिला करिता एक रुद्राक्ष,भस्म, शिवलीलाअमृत ग्रन्था ची भेट देऊन बारा ज्योतिर्लिंग व अठरा नद्याचे पाणी  एक लोटा जल स्वरूपात अर्पण करून देण्याचे व भोलेनाथाचे दर्शन घडवुन देण्याचे भाग्य उपलब्ध करून दिले. 

संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,उर्मिला बोराडे,खरेदी-विक्रि संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे,विजया बोराडे,साईराज बोराडे नयन बोराडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. प्रवीण लोया,प्रभाकर सुरवसे,श्रीनिवास झंवर, बिपीन मंत्री या सर्व दाम्पत्यांनी पूजा केली. धार्मिक विधी संपन्न करून भोलेनाथ महेश्वरांचे दर्शन सर्वांना खुले करण्यात आले. शहरातील हजारो महिला व पुरुष भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोदराव बोराडे आणी त्यांच्या मित्र मंडळानी आटोकाट प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post