. डॉ भागचंदजी मालाणी व स्व.सौ.सरला मालाणी स्मृति प्रीत्यर्थ विवेकानंद विद्यालयास स्टडी डेस्क उपलब्ध करून दिले.



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिवाजी शिंदे परभणी. 

सेलु  :  येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयाला, सेलू येथील  डॉ.सुजित मालाणी व सौ उज्वलाताई मालाणी यांच्या मार्फत इयत्ता पहिली व दुसरी साठी एकूण 120 स्टडी डेस्क देण्यात आले. तसेच शेक हँड फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

स्वर्गीय डॉ. भागचंदजी मालाणी आणि स्व. सरलाताई मालाणी यांच्या संस्काराच्या छायेत वाढलेल्या मालाणी परिवाराने दातृत्वाचा गुण जपत शाळेस डेस्क उपलब्ध करून दिले. यावेळी व्यासपीठावर विवेकानंद संस्कार केंद्राचे स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर,मुख्याध्यापक शंकर शितोळे, शिवनारायण मालाणी, आनंद मालाणी, गिरीश मालाणी, डॉ.सुदर्शन मालाणी, गोविंद कासट,डॉ.सुबोध माकोडे,डॉ. सतीश लिपणे,ऍड.सुभाष भरदम,दिलीप बेदरकर,कृष्णा पांचाळ यांची उपस्थिती होती.

यावेळी मनोगतात बोलताना डॉ सुजित मालाणी यांनी डेस्क देण्या मागील उद्देश मुलांना पाठ व मानेचा त्रास होऊ नये व अक्षरे सुधारण्यासाठी मदत होईल असे नमूद केले.आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यात मालाणी कुटुंबीय हिरहिरीने सहभागी आहेत व यापुढे असेच सहभागी राहू असे नमूद केले.स्थानिक कार्यवाह श्री बेलूरकर यांनी शाळेला केलेल्या मदतीबद्दल मालाणी कुटुंबीयांचे आभार मानत समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव मालाणी परिवाराला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तर अध्यक्षीय समारोपात श्री चौधरी यांनी मालाणी कुटुंबीयांचा हा वारसा आपणही पुढे चालवत आहात,याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एक आदर्श कुटुंब कसे असावे याचे मालाणी कुटुंबीय हे मूर्तीमंत उदाहरण आहेत,असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक राजूरकर यांनी केले तर आभार सौ रागिणी जकाते यांनी मानले.यावेळी वंदे मातरम ने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ पांचाळ,सौ दिपाली पवार,सौ शारदा पुरी,चंदू कव्हळे, चेतन नाईक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post