बालिंगा येथे सराफ व्यावसायिकावर गोळीबार करणारयास अटक.16लाख 23हजाराचा मुद्देमाल जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-करवीर तालुक्यातील बालिंगा येथे कात्यायनी ज्वेलर्सवर चौघां संशयीतानी दरोडा टाकला होता.त्यातील एकाने गोळीबार करून सराफ व्यावसायिक काका पुतण्यावर बेछूट गोळीबार करून फरार असलेला अंकिंत उर्फ छोटू श्रीनिवास शर्मा याला इंदौर येथे  अटक केली. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला हा संशयीत इंदौर येथे चोरीतील दागिने विक्री करण्यास येणार असल्याचे समजले वरून कोल्हापूर येथील हे पथक इंदौर येथे जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 16लाख 23हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यातील तिघां जणाना या पूर्वीच अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.आता पर्यंत चौघां आरोपींना अटक करून त्यांच्या कडील 44 लाख 54 हजार 695 किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे ,सहा.पो.नि.सागर वाघ,पो.उ.नि.विनायक सपाटे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post