इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शासकीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा गोविंदराव हायस्कूल येथे तसेच बुद्धीबळ स्पर्धा व्यंकटराव हायस्कूल येथे संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह  : 

  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणेत येते. यावर्षी सन २०२३-२४ सालच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे .यामध्ये विविध क्रीडा प्रकाराच्या समावेश  आहे. 


या अनुषंगाने सोमवार दि.११ सप्टेंबर रोजी महानगरपालिका स्तरावरील १४,१७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजीच्या क्रीडांगणावर तसेच याच वयोगटातील मुला मुलींच्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा व्यंकटराव हायस्कूल येथे महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री सूर्यकांत शेटे, सहा.आयुक्त  इस्टेट विभाग  पाटील, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, सचिन खोंद्रे, प्रा. शेखर शहा, शंकर पोवार,प्रशालेचे मुख्याध्यापक एस. एस. चिंचवाडे, उपप्राचार्य आर. जी. झपाटे,पर्यवेक्षक  एस.एस.तेली, आर. डी. पिष्टे, व्यंकटराव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री खोत,व्हॉलीबॉल विभाग प्रमुख भिकाजी माने, गणेश बरगाले, अश्विनी कांबळे, विश्वनाथ माळी, अमित कागले, अमित पाटील, कृष्णात पाटील, अडकिल्ला सर,अमर भिसे,पंच साजिद मुजावर,विशाल जाधव यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

  यावेळी गोविंदराव हायस्कूल येथे स्पर्धा शुभारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्या शाळेत आपण शिकलो  त्या शाळेत शालेय स्पर्धेचा शुभारंभ  करणेचा बहुमान मिळाला हा क्षण मोठ्या भाग्याचा असलेचे मत  इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे यांनी व्यक्त करुन  खेळाडूंना पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.


  

           

Post a Comment

Previous Post Next Post