ATM फोडून चोरीच्या प्रयत्नात असलेले आरोपी महाड एमआयडीसी पोलीसांकडून जेरबंद



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

दिनांक १२/०८/२०२३ रोजी रात्री ११.०० वाजेपासुन प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री गस्तसाठी पोलीस अंमलदार नेमले जातात. महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतसुध्दा त्याप्रमाणे नाईट गस्त नेमण्यात आलेली होती. विखाडी भागामध्ये सशस्त्र गस्तीसाठी पोशि/ ९०८ पाटील व पोशि/ ८३८ सुरनर यांना नेमण्यात आलेले होते.

दिनांक १३/०८/२०२३ रोजी रात्री ०२.०० वाजणेचे सुमारास पोलीस स्टेशनमधील रात्रीचे ठाणे अंमलदार पोह/ १०५७ शास्त्री यांना नवी मुंबई येथील एस. बी. आय. बँकच्या सेक्युरिटी ई-सर्वेलन्स सिस्टीमच्या कंट्रोल रूममधून फोन आला की, पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एस. बी. आय. चे एक एटीएम मशिन फोडण्याचा प्रयन्त होत आहे. त्यावरून ठाणे अंमलदार यांनी रात्रीगस्तच्या सर्व कर्मचारी यांना प्राप्त झालेले ते फोटोग्राफस मोबाईलवर पाठविले. नेमके त्याचवेळी विखाडी भागात रात्रगरत करणारे पोशि/९०८ पाटील व पोशि/८३३ सुरतर हे एस.बी. आय. एटीमचे क्युआर कोड स्कॅन करणेसाठी ओटीएम मशिनजवळ पोहचले असता, त्यांना ओटीएम रूममध्ये आवाज आला व दोन व्यक्तींचे अस्तित्व आतमध्ये जाणवले. कोणीतरी आल्याचे जाणवल्यामुळे आरोपी इलेक्टीक बॅटरी ठेवलेल्या ओटीएमच्या आतील रूममध्ये लपले.. पोलीसांनी सोबतच्या रायफलचा धाक धाकवुन आरोपींना बाहेर येण्यासाठी आदेश दिला असता त्यातील एका आरोपीने पोलीस शिपाई पाटील यास हातातील पक्कड फेकून मारली. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाच्या नडगीला मुका मार लागला आहे.

आरोपींकडून प्रतिकार होत आहे हे लक्षात येताच पोलीस शिपाई सुरनर यांनी त्यांच्याजवळील रायफल लोड केली. त्यामुळे आरोपी घावरून एटीएम रूमच्या बाहेर आले. शिपाई सुरनर यांनी दोन्ही आरोपींना रायफलच्या निशान्यावर ठेवुन हात वर करायला लावुन गुडघ्यावर बसविले. त्यावेळी स्वतःला झालेल्या इंजेकडे दुर्लक्ष करून पोलीस शिपाई पाटील यांनी आरोपींकडे असलेले कटावणी, स्क्रू ड्रायवर व फेकुन मारलेली पक्कड ताब्यात घेतली व पोलीस स्टेशनमध्ये मदतीसाठी फोन केला.

पोलीस मदत पोहचल्यावर मोबाईलवर असलेले फोटो व आरोपींचे चेहरे तपासले असता ते एकच असल्याची खात्री झाल्यामुळे आरोपी तसेच त्यांच्याजवळ मिळुन आलेली हत्यारे पोलीसांनी ताब्यात घेतली. आरोपींकडे विचारपुस केली असता, त्यांची नावे १) मनोज दत्तु सुर्यवंशी वय: ३० वर्षे, आंबेगाव ता. देवणी जि.लातुर सध्या रा.प्रशांत कदम रा. खरखली ता. महाड जि.रायगड २) सुनिल दशरथ गोगावले वय: २८ वर्षे. मालेकर कोड किंजळीली ता. महाड जि.रायगड असे सांगितले. 

पोलीसांनी मुळ रा.ताब्यात घेण्यापुर्वी एटीएम सेंटरमध्ये असलेल्या ०३ मशिनपैकी ०१ मशिन फोडून तिच्यातुन पैसे काढण्याचा प्रयन्त केला आहे. परंतु नेमके त्याचवेळी पोलीस पोहचल्याने त्यांना मशिनमधुन रक्कम चोरता आलेली नाही.

आरोपींनी सांगितलेली नावे व पत्ते यांची शहनिशा करण्याचे तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासण्याचे काम प्राधान्याने चालु आहे. वर उल्लेख केलेल्या आरोपींविरूध्द भारतीय दंड संहितेच्या तसेच सार्वजनिक मालमत्तेस हानी पोहचविण्यास प्रतिबंध कायदा १९८४ च्या विविध कलमान्वये महाड एमआयडीसी पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन मा. पोलीस अधीक्षक सो. रायगड तसेच अन्य वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. नागदिवे हे पुढील तपास करत आहेत. आरोपींविरूध्द भक्कम व शास्त्रशुध्द पुरावा गोळा करण्यासाठी इन्वेस्टीगेशन कार, फिंगरप्रिंट एकस्पर्ट, डॉग युनिट इत्यादींची मदत घेतली जात आहे.

रात्रौगस्तीचे पोलीस कर्मचारी पोशि/ ९०८ पाटील व पोशि/ ८३३ सुरनर यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे अंदाजे ०१ कोटी रुपयांच्या रकमेची चोरी टळलेली आहे. तसेच त्यांच्या अतुलनिय धैर्यामुळे ०२ आरोपींना रंगेहात पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.

जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग

Post a Comment

Previous Post Next Post