राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना तब्बल दीड वर्षांनी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना तब्बल दीड वर्षांनी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय.सुप्रीम कोर्टाने प्रकृतीच्या कारणासाठी नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केलाय. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असल्याची बातमी समोर आली होती.

नवाब मलिक यांना मुंबईत विशेष पीएमएलए कोर्टाने खासगी रुग्णालयात उपचारासाठी देखील परवानगी दिली होती. मलिक यांना किडनीशी संबंधित आजार आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी नवाब मलिक यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर मलिक यांना आज उपचारासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

“कोर्टाकडून कुणाकडून काय बाजू मांडण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती आता येईल. पण सर्वोच्च न्यायालयाने बेल दिली हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टात काय झालं, कुणी बाजू मांडली, सरकारच्या बाजूने कुणी बाजू मांडली की याबाबत माहिती घेऊ”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post