मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे मराठा क्रांती मोर्चा कडून आरक्षणासहविविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन

सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करत मिरजेत निदर्शने

प्रेस मीडिया लाईव्ह :

मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे 

मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे मराठा क्रांती मोर्चाकडून 9 आगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून  आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे .

  अधिवेशनात 150 इतके मराठा आमदार असूनसुद्धा फक्त आमदार विश्वजित कदम यांनीच मराठा आरक्षणाचा विषय काढला तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तसेच राज्यातील मराठा समाज्याच्या खासदारांना मराठा समाजाची ताकद दाखवू व सर्व मराठा समाजातील आमदार आणि खासदार यांचा निषेध व्यक्त करत असल्याचे सांगितले तर हे एकदिवसीय धरणे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान ते राज्यातील सर्व तालुका आणि जिल्ह्यात एकाच वेळी सुरू असल्याची माहिती दिली तर सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करत निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मराठा समाजाचे असंख्य  समाजबांधव उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post