बी. एड द्वितीय वर्ष निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव येथे बी. एड द्वितीय वर्ष निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती  व स्वर्गीय अशोकराव माने साहेब यांच्या प्रतिमेच्या  पूजनाने व वृक्ष जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . 


मा.श्री सुतार साहेब यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. द्वितीय वर्षातील आदर्श विद्यार्थी व आदर्श छात्र मुख्याध्यापक यांचाही माननीय प्र. प्राचार्या आर. एल.निर्मळे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. द्वितीय वर्षातील छात्राध्यापकांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक, प्राचार्य आणि इथे आलेल्या अनुभव सर्वांसमोर शेअर केले तसेच आपण या कॉलेजमध्ये कशाप्रकारे घडलो ,शिक्षकांचे साह्य लाभले , त्यांचें मार्गदर्शन याचे ऋण व्यक्त केले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील छात्राध्यापकांना शुभेच्छा देत त्यांच्याविषयी असणारी आपुलकी आदर मनोगतातून व्यक्त केला. 

कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री विश्वास सुतार साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शाहूवाडी कोल्हापूर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा संदर्भ देत आपल्या मनोगतास सुरुवात केली . भारतीय संविधान आणि लोक, मुलास पत्र , तुकाराम नावाचा संत माणूस, नाळ, महात्मा बसवण्णा जीवन आणि संघर्ष अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेले आहे. त्याच्या अनुषंगाने वाचनाचे महत्त्व आणि आपल्याला आलेले  अनुभव जर आपण लिहून ठेवले तर आपल्यातील एक वाचक आणि लेखक नेहमीच जिवंत राहतो.तसेच थोडा जरी वेळ मिळाला तर तो वाचानामध्ये घालवला पाहिजे असं सरांनी सांगितलें. सुतार साहेब यांनी अवधान यावर खूप उत्तम प्रकारें मार्गदर्शन केले. कोणतेही गोष्ट करत असताना, किंवा ऐकत असताना आपले मन आणि लक्ष हे केंद्रित असले पाहिजे तरच आपण यशाचे शिखर पार करू शकतो.त्यामुळेच अवधान ठेवून आपण यशाकडे वाटचाल केली पाहिजे.असं मोलाचे मार्गदर्शन सरांनी केले.त्याचबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा निर्मळे मॅडम यांनी निरोप समारंभ वेळी  मार्गदर्शन केले. भावी शिक्षक, किंवा आता बाहेर पडणारे विद्यार्थी यांनी जॉब करत असताना फक्त एक पैशाचे साधन म्हनून न बघता त्यामध्ये समाधान शोधले पाहिजे. ते जे शिकविण्याचे काम करतात त्याचा मोबदला कमी असेल आणि समाधान मिळत असेल तर त्याच्यासारखे दुसरे सुख कोणतेही नाही. त्यामुळे सेवा, समाधान या बाबी विचारात घेवून आपण प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. तसेच विवीध प्रकारचें वाचन केले पाहिजे. वाचनाने व्यक्तिमत्व बदलते याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.व विद्यार्थ्याना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि स्नेहभजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षातील छात्र अध्यापिका दिव्या माने व सुप्रिया किबिले यांनी केले.प्रमुख पाहुणे परिचय श्री सोरटे एस .के. यांनी करून दिला. प्रास्ताविक प्राध्यापक शिरतोडे व्ही एल यांनी केले .तसेच कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी सारिका माने यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष  माननीय श्री विजयसिंह माने साहेब आणि संस्थेचे कार्याध्यक्ष विकासराव माने साहेब यांचे सहकार्य लाभले.अश्या प्रकारे कार्यक्रम  पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post