ऑल इंडिया मुस्लिम O.B.C. ऑर्गनायझेशन मेळावा संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह  :

इचलकरंजी - ऑल इंडिया मुस्लिम O.B.C. आर्गेनायझेशन, इचलकरंजी शहराचा मेळावा संघटनेचे राष्ट्रीयअध्यक्ष व O.B.C. चे जनक मा. श्री. हाजी शब्बीरभाई अन्सारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. नगरसेवक श्री. मदन कारंडे साहेब होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक हज हाऊसचे अध्यक्ष व मुस्लिम वेलफेअर चे संचालक मा. सादिक जमादार यांनी केले.

 मुस्लिम समाज हा मागास असून आर्थीकदृष्ट्या सक्षम नसलेने शिक्षणापासून वंचीत राहिलेला आहे.त्यासाठी O.B.C. चा आधार घेवून शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. गेली 45 वर्षे घरदार सोडून O.B.C. संघटनेला बळकटी आणणेसाठी शासन स्तरावर समाजाला फायदा मिळण्यासाठी भांडत आहे. तेव्हा आज कुठेतरी मुस्लिम समाज O.B.C. चा फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. असे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रारंभी O.B.C. संघटनेचे शहर अध्यक्ष मा. अतीक समडोळे, माजी शहर अध्यक्ष मुसा खलीफा यांनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केले.

सदर कार्यक्रमासाठी जहाँगीर पट्टेकरी, परवेज गैबान, गुफरान अन्सारी, मुबारक खलीफ, बद्रेआलम देसाई, अझहर डफेदार, इम्रान हावेरी, गौस जमादार, समीर जमादार, इम्तियाज म्हैशाळे, कबनूरचे डॉ. असीफ फकीर, शिरोळचे दिगंबर सकट, अॅड. शितल कांबळे, ताजुद्दिन खतीब, मंत्री उदय सामंत यांची सहाय्यक सचिव मा. सचिन कुमार सावंत, मौलाना जावेदसाहब, सिद्दिक मुजावर, नुरुद्दिन काझी सर,

सरफराज मुजावर, हातकणंगलेचे मा. नगरसेवक नुरमहंमद मुजावर यांचे सह O.B.C. चे इचलकरंजी व पंचक्रोशीतील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा. शानूर कमालशा (सर), यांनी केले व आभार संघटनेचे इचलकरंजी शहर अध्यक्ष अतीक समडोळे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करणेत आली.



अतीक समडोळे 

इचलकरंजी शहर अध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम O.B.C. ऑर्गनायझेशन

Post a Comment

Previous Post Next Post