उजळाईवाडी येथे पोलिसांनी छापा टाकून 50 किलो गांजा जप्त करून भाचा ताब्यात तर मामा फरार



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर-उजळाईवाडी येथील महालक्ष्मी एरीयातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून अंदाजे दहा लाख सात हजार रुपये कि मंतीचा 50 किलो गांजा जप्त करून संशयीत ऋषीकेश निवासराव राऊत (23 ,रा.महालक्ष्मीनगर ,उजळाईवाडी)याला अटक केली.आणि त्याचा साथीदार असलेला मामा रमेश दादासो शिंदे (रा.विक्रमनगर)हा फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी करून विक्री होत असल्याने कोल्हापुरात मोठी खळबळ उडाली आहे.या मुळे किरकोळ विक्री करणारयात भितीचे वातावरण पसरुन त्यांचे धाबे दणाणले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि उपनगरात गांजाची विक्री होत असल्याने वरिष्टांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्या नुसार तपास करीत असता स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार महेश गवळी आणि पोलिस नाईक बालाजी पाटील यांना त्या परिसरात गांजाचा साठा  करून किरकोळ विक्री होत असल्याचे समजले वरुन पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.या मुळे मोठ घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.यातील भाच्यास अटक करून मामाचा शोध पोलिस घेत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत,पोलिस उपअधीक्षक  जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post