खोतवाडीत नाईट काॅलेजचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : प्रतिनिधी : 

मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत एनएसएस , ग्रीन क्लब, रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव मौजे खोतवाडी येथे नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे एकदिवसीय श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी 300 वृक्षारोपण केले. तसेच शहापूरचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक  सत्यवान हाके यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तर इचलकरंजी शहर वाहतूक  नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी उपस्थित मंडळींना पंचप्राण शपथ दिली.

याप्रसंगी इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन व माजी नगरसेवक राहुल खंजीरे,जि.प.सदस्य प्रसाद खोबरे , प्राचार्य डॉ. पुरंदर हे प्रमुख उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ शुभांगी शिंत्रे , गजानन शिरगावे, लोकनियुक्त सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच सुजाता स्वामी, माजी सरपंच संजय चोपडे,ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे,सावंत माने,राहुल कांबळे, अजय डूबल,निर्मला खोत, शिल्पा पोवार, माधुरी सुतार, मंगल मुसळे,माजी उपसरपंच सचिन कांबळे, रवी सासणे, बापू चोपडे, संजय सासणे, अर्जुन रजपूत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन चव्हाण ,ग्रामविकास अधिकारी बोंदर्डे , क्लार्क नानासो कांबळे, मुख्याध्यापक बिरंजे , सर्व शिक्षक स्टाफ ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. विरूपाक्ष खानाज, प्रा. गणेश खांडेकर, प्रा. डॉ. देवेंद्र बिरनाळे, प्रा. रामेश्वर संकपाळ, प्रा. डॉ.माधव मुंडकर ,विभागीय सहसमन्वयक प्रा सय्यद मॅडम, प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. प्रविण पोवार आदी उपस्थित होते. सदर एकदिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे संयोजन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन चव्हाण व ग्रीन क्लब समन्वयक प्रा. अभिजीत पाटील यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post