प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद. "प्रेस मीडिया लाइव्ह" पुणे च्या निवड समितीनचे अध्यक्ष तथा संपादक मा. महेबुब सर्जेखान साहेब यांनी शैक्षणिक क्षेत्रात विध्यार्थी-शिक्षकांसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शेख अब्दुल रहीम यांची "शिक्षणरत्न" पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुणे येथे 20 ऑगस्ट 2023 ला सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती ही केलेली आहे. असे दिलेल्या निवड पत्रात नमूद केलेले आहे.
शेख अब्दुल रहीम हे एक पेशाने शिक्षक आहे आणि ते एका सामजिक संस्था हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनद्वारे विद्यार्थी-शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी अहोरात्र झटत असतात व त्यांच्या मदतीसाठी दिवसरात्र हजर राहतात तसेच विद्यार्थी-शिक्षकांसाठी वर्षभर अनेक उपक्रम राबवितात व कोणताही उपक्रमास पुष्पगुच्छ न देता पुस्तके देणे या उपक्रमाला गल्ली ते दिल्ली पर्यंतचा पायंडा त्यांनी पाडला आहे. या बद्दल तात्कालीन शिक्षणमंत्री मान.ना.श्री.विनोदजी तावडे साहेब यांनी स्वतः हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनचे कौतुक केलेले आहे.तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना दोन वेळी भेटून अनेक समस्यांना मार्गी लावले आहे. त्यांचा या कार्याची दखल घेत "प्रेस मीडिया लाइव्ह " तर्फे दिला जाणारा "शिक्षणरत्न" पुरस्कारासाठी शेख अब्दुल रहीम यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. शेख अब्दुल रहीम यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना संगितले की "हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनच्या कामाची ही पावती आहे. हा पुरस्कार शेख अब्दुल रहीम यांनी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन टीम अणि त्यांच्या सर्व चाहत्यांना व परिवाराला समर्पित केला आहे..!