पनवेल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांंची निवड



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल तालुक्यातील पत्रकारांचे संघटन होवून पत्रकारांच्या विविध प्रश्‍नासाठी आणि लोकहिताच्या निर्णयासाठी पत्रकार एकत्र येवून पनवेल पत्रकार संघ नव्याने स्थापन करून त्या संघाच्या अध्यक्षपदी ज्येेष्ठ पत्रकार आणि दैै.रायगड नगरीचे मुख्य संपादक सुनील पोेतदार यांची एकमताने निवड करण्यात आली.

पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवार दि.13 जुलै 2023 रोेजी पनवेलमधील पत्रकारांची एक बैठक आयोेजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांच्यावर विश्वास ठेवून पनवेलमधील पत्रकारांनी त्यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली. सुनील पोतदार हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व असून ते पत्रकार क्षेत्रात येण्यापूर्वी पुर्वाश्रमीच्या समाजवादी पक्षाचे व त्यानंतर जनता दलाचेे तालुकाध्यक्ष, सचिव तसेेच जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्या काळात त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसाठी संघटन बांधून शेेतकरी, कामगार आदी क्षेेत्रात भरीव असे काम केले आहे. त्यांच्या काळात त्यांनी जिल्हाभर अनेक ठिकाणी मोर्चे, निदशर्र्ने, घेराव असे कार्यक्रम जनतेच्या हितासाठी केले असून त्यांचा पक्ष जनता दलात विलीन झाल्यावर ते जनता दलाचेे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्याच काळात माजी पंतप्रधान कै.विश्‍वनाथ प्रतापसिंग यांना जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पेण येथे आमंत्रित करून जिल्ह्याचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. अशा अनुभवी असलेल्या सुनील पोतदार यांची पनवेेल तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पनवेल पत्रकार संघाला भक्कम असे पाठबळ लाभणार आहे.

या झालेल्या बैठकीला अनिल भोळे, अनिल कुरघोडे, अरविंद पोतदार, मयूर तांबडे, संतोष भगत, सुनील पाटील, रविंद्र गायकवाड उपस्थित होते. त्याचबरोबर पनवेल पत्रकार संघांचे सदस्य विशाल सावंत, दीपक घोसाळकर व संतोष सुतार यांनी पोतदार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व पत्रकारांना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. त्याचबरोबर आरोग्य शिबीर, सामाजिक उपक्रम या संघाच्या माध्यमातून राबविले जाणार असल्याचे यावेळी नवनियुक्त अध्यक्ष सुनील दादा पोतदार यांनी बैठकीत सांगितले.

सुनील पोतदार यांंच्या निवडीनंतर जिल्ह्यातून अनेक मान्यवरांचे दूरध्वनी तसेच पत्रकारांंचे दूरध्वनी त्यांना येवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post