नगरपंचायत खालापूर दांडवाडी स्मशानभूमीची दुरावस्था.... छत्री घेऊन अंत्यसंस्कार करण्याची पाळी.

भ्रष्टाचाराची किड लागलेल्या नगरपंचायत खालापूर हद्दी मध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून  तेथील  हद्दीतील दांडवाडी स्मशानभूमी शेड वरील पत्रे गायब 



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 भर पावसात छत्री घेऊन,अंत्यसंस्कार करण्याची पाळी आल्यामुळे दांडवाडी ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.  नगरपंचायत हद्दीत दिडशे कुटुंबाची लोकवस्ती असलेली दांडवाडी आदिवासी वाडी आहे. दांडवाडी साठी पाताळगंगा नदीकिनारी स्मशानभूमी असून गेल्यावर्षी वादळवाऱ्यात स्मशानभूमी शेडवरिल पत्रे उडून गेले होते. दांडवाडी रहिवासी माजी नगराध्यक्ष दिपक नाईक यांनी स्मशानभूमी दुरावस्थे बाबत नगरपंचायत प्रशासनाला माहिती दिली होती. परंतु प्रशासनाला गांभीर्य नसल्याने स्मशानभूमी शेडची दुरुस्ती रखडली. गेल्या भर पावसात अंत्यसंस्कार करतांना दांडवाडी ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी स्मशानभूमी वर नवीन पत्रे पडतील अशी अपेक्षा दांडवाडी ग्रामस्थांना होती. परंतु अपेक्षा फोल ठरली असून सोमवारी दांडवाडीत मयत झाल्यानंतर पुन्हा पावसात अंत्यसंस्कार करण्याची पाळी आली. यावेळी ग्रामस्थांनी प्रंचड चीड व्यक्त केली असून यापुढे अशी वेळ आल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. 

कोट-

गेल्यावर्षी पासून स्मशानभूमी वर पत्रे बसवा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तीन जणांचे अंत्यसंस्कार भर पावसात केले तरी प्रशासनाला जाग येत नाही हि लाजिरवाणी बाब आहे.कारकून साडेपाच लाख भ्रष्टाचार करु शकतो मात्र साडेपाच हजाराचे पत्रे बसवता येवू नये यामध्ये मुख्याधिकारी यांची प्रशासनावर पकड, नसल्याचे दिसून येत आहे(दिपक नाईक-माजी नगराध्यक्ष खालापूर नगरपंचायत)

Post a Comment

Previous Post Next Post