"निमित्त"आदर्श विचारांची पेरणी करणारे पुस्तक. आसाराम लोमटे.

निमित्त पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन




प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ.शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी :परभणी.

सेलू : ता.30

प्राचार्य द. रा. कुलकर्णी हे मुर्तीमंत आदर्श आहेत. त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडे पाहाण्याची अंतरदृष्टी होती. ते असंख्य विद्यार्थ्यांना ऊर्जा व बळ देणारे व्यक्तिमत्त्व आहे. ते ज्या आदर्श वाटेवरून चालले त्याच आदर्श विचारांची पेरणी 'निमित्त' या पुस्तकात आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यिक तथा पत्रकार डॉ. आसाराम लोमटे यांनी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी लिखित ' निमित्त ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले. 


रविवार ( दि. ३०) रोजी नूतन विद्यालयाच्या राजेंद्र ब.गिल्डा सभागृहात नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि सन्मित्र प्रकाशन समिती यांच्या वतीने स्व.सौ.दुर्गाताई कुलकर्णी यांच्या स्मृति दिनानिमित्त आयोजित प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, माजी सचिव प्राचार्य द. रा. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. आसाराम लोमटे म्हणाले की, ' प्राचार्य द.रा. कुलकर्णी हे मुर्तीमंत आदर्श आहेत. त्यांनी भावी पिढीच्या उज्ज्वल वाटचालीसाठी स्वतः जगलेल्या प्रेरणा, मुल्य, तत्त्वांची पेरणी आपल्या ' निमित्त' या पुस्तकातून केली आहे.' इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव हे मनोगतात म्हणाले की, ' हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा ' निमित्त' या पुस्तकातून उजागर झाला आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पंचाहत्तर वर्षांचा आलेखच ' निमित्त' या पुस्तकात वाचायला मिळतो.' सौ. दुर्गाताई कुलकर्णी यांच्या आठवणींना स्मृतिदिनानिमित्त महिला मंडळाच्या अध्यक्ष विजयाताई कोठेकर यांनी उजाळा दिला. पाहुण्यांचा परिचय डॉ. अनघा देशपांडे यांनी दिला. या कार्यक्रमात नूतन कन्या प्रशालेत संपन्न झालेल्या साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत क्षितीजा खजिने, दुर्गा मगर, आर्या कुलकर्णी, अक्षरा पवार, समिक्षा कुलकर्णी , श्रीनिवास देवकर, आयुष ताठे या विद्यार्थ्यांनी संस्था अंतर्गत व आंतरशालेय गटात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. सान्वी देशपांडेने कथ्थक नृत्य सादर केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. सुत्रसंचलन अशोक लिंबेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुभदा वैद्य यांनी केले. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पुजा महाजन यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रकाशन  झाल्या नंतर सर्वाना विनामुल्य पुस्तकाचे वितरन करण्यात आले.  समारंभ यशस्वीतेसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व वैद्य - कुलकर्णी परिवाराने परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post