लग्नं मंडपातील चोरीस गेलेला कॅमेरा चोरी करणाऱ्यास अटक..

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :            

   कोल्हापूर-गांधीनगर येथील एका लग्नं मंडपातुन क्यमेरा चोरीस गेला होता या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  होता . या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथका मार्फत चालू असताना या पथकातील पोलिस अंमलदार रामचंद्र कोळी यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, ही चोरी सलमान बेळगावी (वय 22 रा.निगडेवाडी) याने केली असून तो चोरीचा माल कंदलगाव परिसरात विक्री साठी येणार असल्याचे समजले वरून या पथकाने त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या हातातील पिशवीत पाहणी केली असता त्यात एक क्यमेरा व लेन्स मिळून आली.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गांधीनगर येथील राधाकृष्ण हॉल येथुन आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली असता त्याच्याकडे असलेला दोन लाख,चोवीस हजार 500 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई मा.पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे ,पोलिस अंमलदार रामचंद्र कोळी सुरेश पाटील,सागर माने,संदिप गायकवाड यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post