कोणत्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हानी होणार नाही यासाठी सर्वोतोपरी नियोजन करावे : - पालकमंत्री दिपक केसरकर



प्रेस मीडिया लाईव्ह :

श्रीकांत कांबळे : 

    इचलकरंजी शहरा सह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. सन २०१९ आणि २०२१ या  वर्षांमध्ये इचलकरंजी सह जिल्ह्यात आलेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज सोमवार दि.२४ जुलै रोजी इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीघाट येथे भेट देऊन पुर परिस्थितीची पाहणी करून महानगरपालिका प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या 

 तसेच कोणत्याही प्रकारची जीवीत अथवा वित्त हाणी होणार नाही याची दक्षता घेणेचे निर्देश इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिले. 

     याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी मोसमी बर्डे-चौगले, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे यांचेसह शहरातील तीनही पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, महानगर पालिकेचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.


          

Post a Comment

Previous Post Next Post