औरंगाबाद जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीचे वाल्मिक समाजाचे एन.एस.के.एफ.डी.सी. चे कर्जाचे प्रकरण त्वरीत निकाली काढा.

 अन्याथा वाल्मिकी समाजातर्फे  "गळ्यात मडकं पाठीला झाडू" लावून मुक निदर्शन लोकशाही मार्गाने करण्यात येईल- राजेंद्र पोहाल.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

औरंगाबाद (प्रतिनिधी ) : 

जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीचे वाल्मिक समाजाचे एन.एस.के.एफ.डी.सी. चे कर्जाचे प्रकरण किमान १० ते १२ वर्षांपासून प्रलंबित आहे, याची गाभिर्याने दखल घ्यावी. अन्यथा दि. ०२/०८/२०२३ रोजी सकाळी १२ ते ०२ वाजे पर्यंत मा. जिल्हा व्यवस्थापक जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन खोकडपूरा,औरंगाबाद या कार्यालयासमोर वाल्मिक समाजाच्या वतीने "गळ्यात मडकं पाठीला झाडू" लावून मुक निदर्शन लोकशाही मार्गाने करण्यातयणार आहे. वाल्मिक समाजाचे कर्जाचे प्रकरण दहा वर्षापासून स्थळ पाहणी व LY नंबर साठी प्रतिक्षा कत आहे. याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

तरी सदरील प्रकरणात जातीने लक्ष देवून आमचे राहिलेले वाल्मिक समाजाचे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढल्यास वाल्मिक समाज आपला अत्यंत आभारी राहील. अन्यथा दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी मा. व्यवस्थापक संचालक कार्यालय महात्मा फुले मागसवर्गीय विकास महामंडळ कार्यालय, जुहू मुंबई या ठिकाणी वाल्मिक समाजाचे आमरण उपोषण करण्यात येईल. मुख्यमंत्री तसेच उप-मुख्यमंत्री आपणास वाल्मिक समाजाच्या वतीने विनंती करण्यात येते की माहात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ कार्यालय ची तपासणी करून वाल्मिक समाज मागच्या २०१३ पासून न्यायाची वाट पाहत आहे.  आता तरी वाल्मिक समाजाला न्याय द्याल हीच समाजाकडून आपेक्षा.

      प्रमुख मागण्या :

एन.एस.के.एफ.डी.सी. २०१२ चे वाल्मिक समाजाचे कर्जाचे प्रकरण लवकरात लवकरमार्गी लावणे. इतर समाजातील महामंडळ स्थापित करण्यात आलेले आहे तसेच वाल्मिकी समाजासाठी वेगळे महामंडळ स्थापित करण्यात यावे.

लाभार्थी निवड समितीच्या मिटिंगमध्ये मंजूरी नसताना यांनी कर्ज प्रकरणे प्रादेशिक कार्यालय व मुंबईला पाठविले आहेत याची चौकशी करण्यात यावी.

मांगणीचे  निवेदन भारतीय बहुजन कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पोहाल यांनी दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post