इचलकरंजी महा नगरपालिकेच्याच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दिनांक २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त राजवाडा चौक येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्ध पुतळ्यास सहा.आयुक्त केतन गुजर  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

          याप्रसंगी नगरसचिव विजय राजापुरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, लेखापरीक्षक नितिन सरगर,जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, मारुती जाधव , सचिन शेडबाळे, दिलीप मगदूम आदी उपस्थित होते.


इचलकरंजी शहरवासीयांनी पुर पाहण्यासाठी पंचगंगा नदीवर गर्दी करु नये :-सहा.आयुक्त केतन गुजर


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 गेले काही दिवसांपासून इचलकरंजी सह कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे  पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८फुट इतकी असून धोका पातळी ७१ फुट इतकी आहे. आज रविवार दि.२३ जुलै रोजी सकाळी११ वाजता पंचगंगा नदी पाणी पातळी *६२* फुट इतकी झालेली आहे. 

   या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेचे सहा.आयुक्त केतन गुजर यांनी पंचगंगा नदीच्या पुर परिस्थितीची पाहणी करून आपत्कालीन विभागास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.त्याचबरोबर नदीवर पुर पाहण्यासाठी येवून स्वतःचा आणि इतरांचा  जीव धोक्यात घालू नये असे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे.

   यावेळी नगरसचिव विजय राजापुरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे, शाक्यानंद कांबळे आदी उपस्थित होते.


        

Post a Comment

Previous Post Next Post