मार्शल आर्टची कलेने आत्मविश्र्वास प्रबळ : विनीत तोष्णीवाल



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी :

 मार्शल आर्टची कला आत्मसात केल्याने आत्मविश्र्वास प्रबळ होतो. गुरुजनांच्या सान्निध्यात एकनिष्ठ राहून आत्मनिर्भर बना. केवळ सितेसह श्रीरामाकडे जाणे शक्य असतानाही हनुमानाने लंकादहन करत भक्ती-युक्तीचा मेळ घातला. हाच आदर्श युवापिढीने घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश माहेश्र्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोष्णीवाल यांनी व्यक्त केले.

इचलकरंजी येथील अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमी आयोजित ‘इंटर डो-जो मार्शल आर्ट शो-फाईट कॉम्पीटीशन’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी श्री. तोष्णीवाल बोलत होते. व्यासपीठावर मारवाडी युवा मंच मिड-टाऊनच्या माजी उपाध्यक्षा सौ. तन्वी तोष्णीवाल उपस्थित होत्या.

प्रारंभी संस्थेच्या मुख्य प्रशिक्षिका सौ. किरण चौगुले यांनी स्वागत केले. खेळाडूंनी मार्शल आर्टची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदक व प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले. सातत्यपूर्ण सराव करणार्‍या आठ खेळाडूंना ‘नियमितपणाची पारितोषिके’ प्रदान करण्यात आली.

यावेळी सौ. दामिनी साळवे, सौ. ललिता वैष्णव, प्रियांका चोयल, शितल पवार आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा सहसंयोजक व्यंकटेश जुगळे तसेच वैभव काळे, रोहित सुतार, रिया चौगुले, शौर्य शिरगावे, प्राजू बिरादार, कुणाल शर्मा आदि ब्लॅक बेल्ट पंच यांना सन्मानित करण्यात आले. मुख्य संयोजिका कु. श्रेया चौगुले यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post