कन्या विद्या मंदिर शिरढोण येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; सौ तेजस्विनी पाटील व डॉ कुमार पाटील दाम्पत्यानी अंकलिपी भेट देऊन केले नवागतांचे स्वागत!!



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 शिरढोण : दिलीप कोळी : 

कन्या विद्या मंदिर शिरढोण येथे आज शैक्षणिक वर्ष 2023 -24 शाळेचा पहिला दिवस  "शाळा प्रवेशोत्सव" उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री बंडगर सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले व शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

शाळेत प्रथमच प्रवेश करणाऱ्या इयत्ता पहिलीच्या मुलांना ग्रामपंचायत सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा शिरोळ तालुकाध्यक्षा सौ तेजस्विनी पाटील व साहित्य परिषद बहुद्देशीय संस्था शिरढोण चे सचिव डॉ कुमार पाटील यांच्या वतीने अंकलिपी भेट देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. अंकलिपी भेट देण्याचा हा उपक्रम गेली 3 वर्षे डॉ कुमार पाटील यांनी अखंडितपणे सुरू ठेवला आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय पुस्तके व गणवेश वाटण्यात आले.  

यावेळी मुख्याध्यापक श्री बंडगर सर, शिक्षक श्री इंगळे सर, दळवी सर, चुडाप्पा सर, शिक्षिका सौ कोठावळे मॅडम, सौ भावसार मॅडम, सौ यादव मॅडम,सरपंच श्री बाबासो हेरवाडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री बाबासो मालगावे, ग्रामपंचायत सदस्य श्री शक्ती पाटील, श्री सागर भंडारे,ग्रामपंचायत सदस्या सौ ललिता जाधव, तंटामुक्ती चे अध्यक्ष श्री प्रमोद कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते श्री हैदर मुजावर, अरुण गेबिसे, रणजित पुजारी यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. आभार श्री इंगळे सर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post