चित्रपट वार्ता : "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड " हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होत आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे :- "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड " हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होत आहे.  केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्ड  विभागाने नुकतेच या माहिती पटास  सेंसर सर्टिफिकेट दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकेतर - कर्मचारी म्हणून काम करीत असताना शैक्षणिक, संशोधनात्मक, कार्यालयीन, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या डॉ. तुषार निकाळजे यांचा  प्रवास दर्शविणारा हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होत आहे. 

एखादा सर्वसाधारण शिक्षकेतर- कर्मचारी कार्यालयीन काम करीत असतानाच उच्च शिक्षण, एम. फिल,पीएच.डी.सारखे संशोधन,  लेख लिहीणे , राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध सादर करणे , अभ्यासक्रमासाठी पुस्तके लिहिणे, घरगुती जबाबदारी, याचबरोबर आर्थिक व इतर संकटांना सामोरे जात संशोधन क्षेत्रातील राज्य -  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविणे व जागतिक विक्रम करू शकतो, ही कथा या माहिती पटात मांडली आहे.

 डॉ. तुषार निकाळजे यांच्यावर आधारलेली ही कथा जगातील शैक्षणिक व संशोधनात्मक कार्य करणाऱ्यांना भविष्यात प्रेरणादायी ठरेल. शोभा फिल्म प्रोडक्शन या संस्थेने माहितीपटाची निर्मिती केली आहे. याचे दिग्दर्शन श्री. शुभम महादेव या  दिग्दर्शकांने केले आहे. या माहितीपटाचे निर्माते व लेखक डॉ. तुषार निकाळजे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post