यवलूज येथील महिलेचा अर्धवट गर्भपात झाल्यामुळे पुढ़ील उपचारा साठी सीपीआर मध्ये दाखल

 श्री हॉस्पिटल मध्ये गर्भपात केला जातो हे सिध्द होते

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापुर-राजारामपूरीत असलेल्या श्री हॉस्पिटल मध्ये या महिलेचा गर्भपात झाला होता.पण त्या हॉस्पिटलवर 12 तारखेला छापा पडल्याने सदर महिलेचा संशयास्पद अर्धवट गर्भपात झाल्यामुळे आज आपल्या जाऊबाई सोबत घेऊन पुढ़ील उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल झाली आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकी त झाली आहे.       

     अधिक माहिती अशी की ,राजामपुरीत असलेल्या श्री हॉस्पिटल मध्ये काही महिला गर्भलिंग निदान साठी आल्या होत्या.त्यामध्ये या महिलेचा समावेश होता.या हॉस्पिटल मध्ये गर्भलिंग निदान होत असल्याची तक्रारदार महिलेसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टींग ऑपरेशन केले करून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी छापा टाकून सोनोग्राफी मशीन शील करण्यात आले.आता पर्यंत या हॉस्पिटल मध्ये कीती पेंशटची निदान केले याची चौकशी होणं आवश्यक आहे.त्या दिवशी कीती महिला उपस्थित होत्या या महिला स्वतःच आलत्या कि त्या कोणा मार्फत आल्या होत्या.ग्रामीण भागातील महिला ह्या ओळखीच्या मार्फतच श्री हॉस्पिटल सारख्या गर्भनिदान साठी येत असतात .अशा हॉस्पिलचे डॉक्टर पेंशट पाठविणारयांना ,मध्येस्ताना कमीशन दिले जाते या सर्व प्रकरणांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई होण्ं गरजेचे आहे. संबंधित महिला सीपीआर रुग्णालयात अर्धवट गर्भपात प्रकरणी पुढ़ील उपचारा साठी दाखल झाल्यामुळे श्री हॉस्पिटल मध्ये गर्भपात केला जातो हे सिध्द होते

Post a Comment

Previous Post Next Post