आक्षेपार्ह स्टेटस,तसेच लव्ह जिहादचे वाढ़ते प्रमाण यामुळे ऊद्रेक झाल्याची शक्यता ?



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-गेल्या काही महिन्या पासून लव्ह जिहादचे प्रकार वाढ़ले आहेत.यांच्यावर कारवाई करण्याची वारंवार मागणी होत आहे.तरी सुध्दा कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे .त्यातच काही जण महापुरुषांच्या विषयी अपमानास्पद व्यक्तवे केली जात आहेत.त्यातच भरीसभर काही युवकांनी मोबाईल वर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.

संतप्त झालेल्या जमावानी टाऊन हॉल परिसर,दसरा चौक ,सोमवार पेठ या ठिकाणी जमाव एकत्र फिरुन घोषणाबाजी करत काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली.जमावातील कार्यकर्ते आक्रमक होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याच्या शक्यतेने पोलिसांचा फौज फाटा आणि पोलिस अधिकारी ही घटना स्थळी हजर होत होते.त्याच वेळी जमावाकडुन एका तरुणाला मारहाण होत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री.तानाजी सावंतसो ,यांनी मोठ्या धाडसाने गर्दीत घूसून त्या तरुणाची सुटका करून जमावाला शांततेचे आवाहन करत होते.त्या वेळी जमावाने सावंतसो यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जमाव काहीसा शांत झाला.                        

    आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारयांवर कडक कारवाई करावी.मुस्लीम समाजाची मागणी.                  

 कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या -गोंविदाने रहात आहेत. कोल्हापुर नगरी ही सलोख्याची नगरी म्हणुन प्रसिद्ध आहे.आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे  कोल्हापूरात अशांतता निर्माण झाली आहे.अशा आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारयांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी कोल्हापूरच्या मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.पोलिसांनी सामाजिक एकतेला बाधा आणणारयांना वेळीच ठेचून काढले पाहीजे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्ती पुन्हा निर्माण होणार नाहीत.असे मुस्लीम समाजाच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.यावेळी कादर मलबारी ,तौफिक मुल्लाणी ,आदिल फरास ,रियाज सुभेदार ,यांच्यासह अन्य कार्यकर्त्यां बरोबरच मुस्लीम बोर्डिंगच्या संचालकांनी दिलेल्या पत्रकात आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारयांचा निषेध केला आहे.      

  या पाश्वभुमीवर अप्पर जिल्हाधिकारी दंडाधिकारी श्री.भगवान कांबळे यांनी जिल्हयात 19 जून पर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. या आदेशांतर्गत जिल्हयात पाच किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येण्यास ,जमाव ,सभा घेण्यास ,मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post