विनायक कुलकर्णी यांची कृषी मेळा अभ्यास दौ-यासाठी निवड



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी 

भारतीय ज्ञान, परंपरा, शिक्षण विभाग व सांस्कृतिक मंत्रालय (भारत सरकार) आयोजित तेजपुर विश्वविद्यालय, आसाम येथे होणाऱ्या कृषि मेळा या शेती विषयक अभ्यास दौऱ्यासाठी देशातील सर्व राज्यातून प्रगतशील शेतकऱ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये टाकवडे गावातील गोसेवक विनायक कुलकर्णी यांची निवड झाली आहे.

टाकवडेचे विनायक कुलकर्णी यांनी गो- सेवेतून चांगली ओळख निर्माण केली आहे. एक गो - सेवा कार्यातील त्यांचा अभ्यास व मार्गदर्शन अनेकांसाठी फायदेशीर ठरले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांची  तेजपुर विश्वविद्यालय, आसाम येथे होणाऱ्या कृषि मेळा या शेती विषयक अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post