७१ वी राजपथ महाराष्ट्र वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप

नाशिकचा सर्वेश कुशरे आणि पुण्याची अवंतिका नराळे सर्वोत्कृष्ट खेळाडू

पुणे जिल्हा पुरुष व महिला संघ ‘टीम चॅम्पियनशिप’चे मानकरी


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथे शिवचित्रपती क्रीडा नगरीत दि.२१ मे पासून तीन दिवस सुरु असलेल्या ७१व्या राजपथ महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेच्या सांगता समारंभात सर्वोत्तम अॅथलेटिक्सचा मान पुरुष गटात नाशिकचा सर्वेश कुशरे आणि पुण्याची अवंतिका नराळे यांनी संपादन केला. तसेच टीम चॅम्पियनशिप चा मान पुणे जिल्हा पुरुष व महिला संघाला मिळाला. या स्पर्धेत एकूण ३३ जिल्ह्यातील ७१५ खेळाडूंचा समावेश होता. त्यामध्ये तेजस शिरसे, सर्वेश कुशरे, निधी सिंग, पूर्वा सावंत, शर्वरी परुळेकर, अवंतिका नराळे अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूंचा सहभाग हेदेखील आकर्षण होते. महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सतीश उचिल उपस्थित होते.


पुण्यात झालेल्या ७१व्या राजपथ महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंची महाराष्ट्र टीममध्ये निवड लवकरच जाहीर होईल. ही महाराष्ट्र टीम ओरीसाची राजधानी भुवनेश्वर येथे दि. १५ ते १८ जून २०२३ या दरम्यान संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ गट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतील अशी माहिती महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सतीश उचिल यांनी दिली. 

आज संपलेल्या या स्पर्धांमधील महत्वाच्या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे. 

पुरुषांच्या २०० मीटर स्पर्धेत मुंबई उपनगरच्या जय शहा याने २१.७४ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. मुंबई शहरच्या अक्षय शेट्टी याने २१.८४ आणि मुंबई शहरचा रिदय जना याने २२.१२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. 

पुरुषांच्या ४०० मीटर स्पर्धेत साताराच्या शुभम देशमुख याने ४७.६४ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. पुणेच्या श्यामराव दौंडकरने ४८.९८ आणि पुणेच्या शुभम पाटणकर याने ४९.२१ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या ८०० मीटर स्पर्धेत अकोल्याचा चैतन्य होल्गरे याने १:५४:३७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या सत्यजित पुजारी याने १:५४:५४ आणि धुळेच्या प्रथमेश देओरे यांने १:५४:५७ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या १५०० मीटर स्पर्धेत कोल्हापूरच्या ओमकार कुंभार याने ३:४८:८२ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. रत्नागिरीच्या संदीप जोयाशी याने ३:५४:०५ आणि मुंबई उपनगरच्या कार्तिक कारकेराने ३:५४:१६ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या १०००० मीटर स्पर्धेत सोलापूरच्या अरुण राठोडने ३१:०९:७६ वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या उत्तम पाटीलने ३१:१८:५६ आणि परभणीच्या विष्णू लव्हाळे याने ३१:३०:६९ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत औरंगाबादच्या तेजस शिरसे याने १३.९७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या विकास खोडकेने १४.७३ आणि मुंबई शहरच्या साहिल गेदामने १५.२२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अकोलाच्या निर्मल यादवने ५२.१७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या रोहन कांबळे याने ५२.४२ आणि पुणेच्या सिद्धेश चौधरीने ५२.५२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या 4X १०० मीटर रिले स्पर्धेत बॉम्बे सिटी-बी टीमने ४३.०७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. ठाणे- एल ने ४३.५५ आणि धुळे-सी टीमने ४३.८९ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या 4X ४०० मीटर रिले स्पर्धेत पूना-जी टीमच्या पी.कदम, प्रफुल्ल लाटे, एस. पाटणकर, एस. दौंडकर यांनी ३:२०:२३ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. पालघर- एफ च्या अनुज यादव, आशिषकुमार सिंग, प्रीत दास, पी. यादव यांनी ३:२२:३० आणि परभणी- पी च्या व्ही.शिंदे, व्ही.केंद्रे, एच. भालेकर, एस.शिंदे यांनी ३:२३:१८ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत नाशिकच्या शुभम भंडारे याने ८:४९:४५ वेळ नोंदवून प्रथम कमांक मिळविला. कोल्हापूरच्या सिद्धांत पुजारीने ९:०३:७२ आणि नागपूरच्या राजन यादव याने ९:०५:६८ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत नाशिकच्या सतीश देशमुखने ४७.९५ मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. पुणेच्या पृथ्वीराज नलावडे याने ४७.९० मीटर आणि अहमदनगरच्या श्रीनिवास कारळेने ४४.८२ मीटर नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशरे याने २.२० मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. सांगलीच्या ऋषिकेश काटेने २.०० मीटर आणि पुणेच्या धैर्यशील गायकवाडने २.०० मीटर नोंदवली.    

महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत सातारच्या सुदेष्णा शिवणकर हिने २५.१३ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्याच्या ख़ुशी उमेशने २५.३० आणि मुंबई शहरच्या सरोज शेट्टी हिने २५.६८ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. 

महिलांच्या ४०० मीटर स्पर्धेत पालघरच्या शिवानी गायकवाड हिने ५४.९८ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. ठाणेच्या निधी सिंगने ५६.०९ आणि पुणेच्या देवश्री लव्हे हिने ५८.५७ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. 

महिलांच्या ८०० मीटर स्पर्धेत नाशिकच्या यमुना लडकत हिने २:०७:३२ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. नाशिकच्या ताई बाम्हणे हिने २:१०:६९ आणि पुणेच्या अर्चना आढाव हिने २:१३:१६ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

महिलांच्या १०००० मीटर स्पर्धेत नाशिकच्या पूनम सोनूने हिने ३४:०५:४८ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. नागपूरच्या प्राजक्ता गोडबोले हिने ३४:३१:०७ आणि साताराच्या रेश्मा केवटे हिने ३४:४०:०१ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.


महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ठाणेच्या क्रिस्टल वडाकेल हिने १६.७६ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. पुणेच्या स्नेहा गर्जे हिने १७.३७ आणि पुणेच्या दीपाली बांदल हिने १८.११ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.  

महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ठाण्याच्या निधी सिंगने १:०२:३० वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. नाशिकच्या श्रावणी सांगळे हिने १:०४:३२ आणि कोल्हापूरच्या श्वेता चिकोडीने १:०५:१२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

महिलांच्या तिहेरी उडी स्पर्धेत मुंबई उपनगरच्या शर्वरी परुळेकर हिने १२.७९ मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. मुंबई उपनगरच्या पूर्व सावंतने १२.७४ मीटर आणि रायगडच्या त्रिवेणी तावडे हिने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

महिलांच्या ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत साताऱ्याच्या सानिका नलावडे हिने ११:४९:६१ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. साताऱ्याच्या वैष्णवी सावंत हिने ११.४९.६२ आणि उस्मानाबादच्या योगिनी साळुंके हिने १२:१२:८४ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.




सतीश उचिल                                                                प्रवीण प्र. वाळिंबे 

महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन (MAA)                          माध्यम समन्वयक 

९८२००४१३७८                                                           ९८२२४५४२३४ / ७३८७००२०९७

Post a Comment

Previous Post Next Post