कोल्हापूर : शिवाजी चौकात एका दुकानाला भीषण आग

 आग विझवण्याचे अग्निशामक दलाकडुन कसोशीने प्रयत्न.                                      


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 


  कोल्हापुर- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील एका इलेकट्रॉनिक दुकानाला अचानक भीषण आग लागल्यामुळे  सर्वत्र खळबळ उडाली.   ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दला कडुन युध्द पातळीवर प्रयत्न चालू होते , आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या आगीत शेजारी असलेल्या काही घरांना आणि काही दुकांनानाही याची झळ बसली आहे. या परिसरात मोठी लोकवस्ती असून लहान मोठी अनेक दुकाने आहेत.ही आग विझवण्याचे अग्निशामक दलाकडुन रात्री उशिरापर्यंत  काम चालू होते.




घटनास्थळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.कांदबरी बलकवडेसो ,या आपल्या सहकारया समवेत जातीने लक्ष ठेऊन हजर होत्या.वीज मंडळाचा स्टाफ ही घटना स्थळी हजर होता.तसेच घटना स्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्या हद्दित असलेल्या ड्युटीवर असलेल्या वीज कर्मचारी यांचे दुर्लक्श.त्याच्याच विभागातील एका व्यक्तीने फोन करून ही  घटना स्थळी येण्याची तत्परता दाखविली नाही.पण ज्या वीज कर्मचारयांची ड्युटी संपली असताना सुध्दा घटना स्थळी येऊन फ्युजा काढ़ून तेथील लाईट बंद करून पुढ़ील धोका टाळण्याचा प्रयत्न केला.घटना स्थळी आलेल्या वरिष्ठांना त्या कर्मचारया विरुध्द तक्रारी सांगीतल्या की साहेब त्यांना अनेक वेळा कॉल करून ही त्यानी प्रतिसाद दिला नाही.आणि आम्ही ड्युटी संपली असतानाही आम्ही घटना स्थळी येऊन ताबडतोब लाइट बंद केल्या .तरी त्या कर्मचारयाला चांगलेच झापण्याचेही वरिष्ठांना जाता जाता सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post