कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हा भाजपसाठी धोक्याची घंटा



प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा  लागलेला निकाल हा भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. याचे कारण  लगेच 2024 ला लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात भाजपला झटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या.

तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपने शिवसेनेसोबत २३ आणि १८ अशा अनुक्रमे जागा जिंकल्या होत्या. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा, २०१९ साली भाजपने १७ जागा जिंकल्यात, पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा, २०१९ साली भाजपने १८ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच या चार राज्यात एकूण १५८ जागा आहेत. थोडक्यात या जागा हातून जाऊ न देणं हेच भाजपसाठी मोठं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या समोर  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post