महात्मा फुले समता परिषद राज्य कार्यकारीनीची बैठक संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :   माजी उपमुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री आमदार मा,ना,छगन भुजबळ साहेब यांनी न्याय मागणी हक्कासाठी स्थापन केलेल्या अ, भा, महात्मा फुले समता परिषद राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथील बांद्रा भुजबळ नॉलेज सिटी या ठिकाणी घेणेत आली .

यावेळी ना,छगन भुजबळ यांनी प्रदेश,विभागीय,जिल्हा ,तालुका,शहर कार्यर्त्याकडून त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला, ओ, बी, सी, आरक्षण धोक्यात आले त्यावेळी आरक्षण वाचवण्यासाठी समता परिषदेने सरकारशी कसा लढा दिला व आरक्षण अडचणीतून बाहेर काढणेसाठी कसा प्रयत्न केला याबाबत मा,ना,छगन भुजबळ साहेब व प्रा,हरी नरके यांनी सांगितले,समता परिषद ही सर्व जाती धर्माशी संलग्न असून मी जरी ओ, बी, सी असलो तरी समता परिषद सर्व जाती धर्मासाठी काम करत आहे असे मा,ना, छगन भुजबळ साहेब यांनी सांगितले, माझ्या संघटनेत सर्व जाती,धर्मातील कार्यकर्त्यांना एकत्र करून समता परिषदेची कार्यकारिणी तयार करण्याच्या सूचना दिल्या,

        यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ साहेब, प्रदेश सचिव रवी सोनवणे,राज्य विभागीय अध्यक्ष मा,श्री आंबदास गारुड, प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, मुंबई अध्यक्ष मा,श्री मंडलिक,आणि सर्व अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष,कोल्हापुरातून जिल्हा कार्याध्यक्ष श्री दादासाहेब चोपडे,जिल्हा अध्यक्ष पूर्व विभाग श्री बाबासाहेब बागडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post