नांदणी येथील युवकाचे अपहरण करून मारहाण , चौघाना अटक



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर -नांदणी येथील श्री.अभिनंदन भरतकुमार उपाध्ये (34 वय). यांचा चुलत भाऊ तिर्थराज (वय 32).याला ता.22/5/23रोजी सायंकाळी आठ वाजता.जयसिंगपूर येथील रेल्वे स्टेशनवरून चौघांनी अपहरण करून पांढ़रया रंगाच्या बोलेरो जीपगाडीतुन नेल्याची तक्रार जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन 23/5/23 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी यांनाही भेट देऊन याघटने बाबत तत्कालीन पोलिस अधीक्षक श्री.बलकवडेसो ,माहीती दिली       असता श्री.बलकवडे यांनी या घटनेचे गांभिर्य ओळखुन त्यानी स्थानीक गुन्हा अन्वेशन विभागाला आणि जयसिंगपूर येथील पोलिस ठाण्याच्या प्रभारी यांना तपासासाठी पथके तयार करून अपहरण झालेली व्यक्ती लवकरात लवकर मिळण्यासाठी सूचना दिल्या.असता काही पथके जयसिंगपूर ,शिरोळ कुरुंदवाड सह कर्नाटक राज्यातील नेज ,बेडकीहाळ आणि सदलगा गावच्या हद्दीत शोध घेत असताना नेज ता.चिकोडी जि.बेळगाव इथल्या मसूते यांच्या फिल्टर हाऊस जवळच्या उसाच्या शेतात अपहरण झालेली व्यक्ती जखमी अवस्थेत सापडली असता त्याला बेडकीहाळ येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढ़ील उपचारा साठी इंचलकरंजी येथील अलायन्स दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे. अपहरण केलेल्या व्यक्तीनी तिर्थराज याला गंभीर रित्या मारहाण करून त्याला तेथेच टाकून निघुन गेले.मा.कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत यांनीही सर्व गुन्हयाची माहीती घेऊन याचाही लवकरात लवकर तपास करून आरोपीना पकडण्याच्या सूचना दिल्या.स्थानिक गुन्हा अन्वेशेन शाखेचे पो.निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की ,सदरचा गुन्हा नांदणी येथील आण्णासो करयाप्पा याने आपल्या साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली ते सर्व जण बेडकीहाळ येथे साखर कारखानाच्या गाडी अड्यात येणार असल्याचे समजले वरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण यंत्रणेने सापळा रचून 1)अनिल उर्फ आण्णासो राघु करयाप्पा ,2)चेतन   बसर्गे ,3)सुनिल खिल्लारे ,4)संतोष एकोंडें अशा चौघाना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी अनिल करयाप्पा आणि तिर्थराज उपाध्ये यांच्यात वाद होता.या कारणातुन चौघांनी अपहरण करून मारहाण करून जखमी अवस्थेत मयत झाला असे समजून त्याला उसाच्या शेतात टाकून देऊन पळून गेल्याचे सांगून गुन्हयाची कबुली दिली आहे.सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलिसउप निरीक्षक श्री.वाघ साहेब.जयसिंगपूर पोलिस ठाणे करीत आहे.सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण यंत्रणेने आणि जयसिंगपुर पोलिस या दोघांनी मिळून केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post