वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींचा शोधून त्यांचा सन्मान केला हे उल्लेखनीय कार्य आहे ..... प्रसाद कुलकर्णी



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे ;

कोल्हापूर-  पुणे येथील प्रेस मिडीया लाईव्ह चा तिसरा वर्धापनदिना निमीत्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.याकार्यक्रमाचे अध्यक्ष समाजवादी प्रबोनिधी,सरचिटणीस श्री.प्रसाद कुलकर्णी आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ईश्वर परमार(माजी नगरसेवक.कोमनपा ) बुलेटउल्लेखनीय आहे. प्रसाद कुलकर्णी लोकसत्ताचे पत्रकार श्री.दयानंद लिपारे,जेष्ठ साहित्यीक श्री.पाटलोबा पवार ,परतगंगाचे पत्रकार श्री.सखाराम जाधव आणि प्रेस मिडीयाचे लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या उपस्थितीत पार पडला

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. समाजात विवीध क्षेत्रात उलेखनीय कामगिरी करण्यारयांचा प्रेस मिडीया लाईव्ह तर्फे सन्मान करण्यात आला.समाज जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करतात अशाना शोधून निवड करुन जो सन्मान केला त्या बद्दल श्री .प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रेस मिडीया लाईव्हचे कौतुक केले.तसेच कोल्हापूर जिल्हयातील पत्रकारांचा ही पुरस्कार देऊन जो सन्मान केला त्या बद्दल ही गौरवोद्गार काढ़ले.

यावेळी मान्यवरांनी शुभेछ्या देण्यात  आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.स्वपनील पन्हाळकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रेस मिडीयाचे पत्रकार मुरलीधर कांबळे यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि पुरस्कारकर्त्यानी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी मोहसीन सर्जेखान संपादक ,महानसत्ता न्यूजचे संपादक लियाकत सर्जेखान कार्यक्रमाचे व्यवस्थापक मुरलीधर कांबळे आणि प्रेस मिडीयाचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान हजर होते हा कार्यक्रम मा.श्री.सय्यद नासीरउद्दीन हाश्मी (ग्रामपंचायत सदस्य,बीड).यांच्या सौजन्याने पार पडला.शेवटी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे स्वप्निल पन्हाळकर यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post