कोल्हापूर शहरात बंगला फोडुन 20 तोळे दागीन्यावर डल्ला मारुन दुचाकी लंपास



  प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :            

  कोल्हापुर -मंगळवारी (ता.16). च्या रात्रीच्या सुमारास झोपेत असताना चोरीचा प्रकार त्या कुंटुबातल्या लोकांना सकाळी लक्षात आले चोरट्यांनी जाताना तेथेच घाण करून गेले.आणि जाताना बंगल्यातील दुचाकी ही घेऊन गेले.मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्या  असल्या कारणाने काही जण पर्यटणाला जात असतात त्या मुळे बंद बंगले चोरटे लक्ष करतात.

अशा बाहेरील किंवा स्थानिक टोळ्या डोके वर काढू लागले आहेत.अधिक माहिती अशी की,रुईकर कॉलनी येथील निरंजन वायचळ यांच्या बंगल्यात भाडेकरु म्हणून सुरज इराप्पा सुतार रहात आहेत.त्या बंगल्यात एक लहान आणि दोन मोठे रुम असून घरातील सर्व जण एका रुम मध्ये झोपले होते एका रुम मध्ये साहीत्य होते.काल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनीहॉल मधील ग्ग्रील तोडून खिडकीचा दरवाजा उघडून आत शिरले.

यावेळी सुतार कुंटुबीय एका रुम मध्ये झोपले होते.चोरट्यांनी तिजोरी विस्कटून   त्यातिल 20 तोळे दागिने चोरुन नेले महत्वाचे म्हणजे चोरटे तीन तास वावरत होते.सुतार कुंटुब सकाळी उठल्यावर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.पोलीस घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तद्न्यासह दाखल झाले.पोलिस सीसीटीव्ही द्वारे शोध घेत आहेत.चोरटे रात्रीच्या वेळी बंगल्यात घूसून ते पहाटे पर्यंत होते.त्या नंतर चारच्या सुमारास बाहेर पडले.त्याची सर्व हालचाल सीसीसी टीव्ही फुटेज द्वारे शेजारच्या बंगल्यातुन पोलिसांना मिळालं आहे.सदरचा गुन्हा शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


...

Post a Comment

Previous Post Next Post